मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
.jpg)
मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते तर कुशल युद्धनीतीकारही होते. त्यांच्या युद्धशैलीत गनिमी कावा’ या विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्राचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. नुकत्याच झळकलेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. नजरेत भरणारे दाट जंगल आणि त्यात झळकणारा ‘२२ मराठा बटालियन’ हा शब्द प्रेक्षकांना च...