Posts

Showing posts from October, 2024

तेजस्विनी पंडित दिसली तिहेरी भूमिकेत

Image
  तेजस्विनी पंडित दिसली तिहेरी भूमिकेत  ‘येक नंबर’मध्ये अभिनेत्री ,निर्माती आता लेखिकेच्या भूमिकेतून येणार समोर तेजस्विनी पंडित… मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी, अभ्यासू अभिनेत्री. पडद्यावर आपण तिला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहातच असतो. परंतु यावेळी तेजस्विनी वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने तेजस्विनी लिखाण क्षेत्रात पदार्पण केले आहे.  निर्मिती आणि लेखनाव्यतिरिक्त तिचा अभिनयही यात पाहायला मिळत आहे. तेजस्विनी यात पोलिसाच्या भूमिकेत झळकली असून पहिल्यांदाच ती या व्यक्तिरेखेत दिसत आहे. एकाचवेळी अशा तिहेरी भूमिकेत पाहाणे, म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.  आपल्या या तिहेरी भूमिकेबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ‘’लिखाणाची आवड पूर्वीपासून होतीच, फक्त आधी स्वतःपुरत लिहायचे आता सिनेमासाठी लिहिलंय. खरंतर व्यक्त होणं गरजेचं असतं. काय व्यक्त होताय ह्यावर प्लॅटफॉर्म ठरतो. मला हा विषय खूप मोठ्या स्केलवर दिसत होता म्हणून मी यावेळेला सिनेमा ह्या माध्यमामधून व्यक्त व्हायचं ठरवलं. मोठी जबाबदारी ह...

शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे येणार पहिल्यांदाच एकत्र..

Image
' बंजारा'च्या २० फूट भव्य पोस्टरचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते अनावरण शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे येणार पहिल्यांदाच एकत्र स्नेह पोंक्षेचे दिग्दर्शनात पदार्पण  मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करत असलेल्या 'बंजारा' या चित्रपटाचा शानदार पोस्टर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटाच्या २० फूट उंचीच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सोहळ्यात विशेष लक्षवेधी ठरली ती शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे आणि स्नेह पोंक्षे यांची बाईकवरील ग्रँड एन्ट्री. या कार्यमक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महेश मांजरेकर उपस्थित होते. स्नेह पोंक्षे लिखित, दिग्दर्शित 'बंजारा' या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्रीचा प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. 'बंजारा' चित्रपट येत्या नाताळमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये तीन वयस्क मित्र सिक्कीमच्या पर्वतरांगांमध्ये बाईकराईडचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी किती आनंददायी आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत आहे. अनेकदा कुठे जायचंय, यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्...

शारदेची आराधना असणारं, ‘फुलवंती’ चित्रपटातील ह्रदयस्पर्शी गाणे

Image
शारदेची आराधना असणारं,  ‘फुलवंती’ चित्रपटातील ह्रदयस्पर्शी गाणे नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. नवरात्रीच्या या मंगलमय उत्सवात सर्वत्र आईचा जागर सुरु असतो. सरस्वती ही भारतीय संस्कृतीतील एक श्रेष्ठ देवता आहे. शारदा हे सरस्वतीचे रूप. ज्ञानाची अन् विद्येची देवता अशी ओळख असलेल्या तेजोमय रूपातील 'शारदे'ची उपासना आगामी ‘फुलवंती’ या चित्रपटातील 'हे शारदे' या गाण्यातून पहायला मिळणार आहे. वाहतो ह्या इथे ज्ञान रुपी झरा प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा विद्या असे जिथे लक्ष्मी वसे तिथे देसी तू जना अखंड सुखसंपदा  असे बोल असणारं हे गाणे मनाला  प्रसन्नतेची आणि ऊर्जेची अनुभूती देते. मंदार चोळकर लिखित हे गाणं  राहुल देशपांडे यांनी स्वरबद्ध केले आहे. संगीतकार अविनाश विश्वजीत यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. देवीचे रूप भक्तांच्या मनामनात अंतःकरणात कायम असते. तिच्याप्रती भावना गुंतलेल्या असतात. याच भावना ‘हे शारदे’ या गाण्याच्या वेळी आमच्या सर्वांच्या मनात होत्या असं सांगत उर्जेची अनुभूती देणारा हे गाणं प्रत्येकाच्या मनात चैतन्य निर्माण करेल, असा विश्वास ‘फुलवंती’ चित्रपटाच...